शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मोताळ्याला उन्हाचा तडाखा

By admin | Updated: April 20, 2017 23:50 IST

मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने तालुकावासीयांची तगमग होत आहे.

मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने तालुकावासीयांची तगमग होत आहे. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होणार उकाडा त्यात भर घालत असल्याने मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या उन्हाचा तडाखा तालुकाभरात तीव्र असून, १९ एप्रिल रोजी मोताळा शहराच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअस टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरवड्यापासून तापमानाचा आलेख उंचावत आहे. दिवसा ३९ ते ४४ अंश सेल्सिअश, तर संध्याकाळी २२ ते २५ अंश सेल्सिअशपर्यंत तापमान राहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वाढत्या उन्हाच्या झळांनी सर्व नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तापमान सकाळ-संध्याकाळ कायम राहत असल्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची तीव्रता सहन करावी लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, वाढत्या उष्णतेचा आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाबरोबरच कमी दाबाचा परिणाम निघाल्यावर असह्य उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढल्यामुळे शहरातील व्यापार मंदावला आहे. वाढत्या उन्हामुळे वन्य जीवांची होरपळ होत असल्याने वन्य जीव पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदी विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळा डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होत आहेत. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत असून, दुपारचे ऊन टाळून अनेक जण सायंकाळी खरेदी करणे पसंत करीत आहेत. वाढत्या तापमानामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, घरोघरी कुलर, पंख्याचा वापर वाढला आहे. कोल्ड्रिंक, रसवंती, आईस्क्रिम, ज्यूस सेंटरवर गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथ रोगाची शक्यता अधिक असते. तीव्र उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होऊन संचार बंदी लागल्यासारखे दिसून येत आहेत. उन्हात फिरणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.