शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: December 20, 2014 00:27 IST

दप्तरदिरंगाईला कंटाळल्याने महिलेचा पवित्रा.

संग्रामपूर (बुलडाणा): वारंवार चकरा मारूनही कामास टाळाटाळ होत असल्याने कंटाळलेल्या तालु क्यातील निवाणा येथील मागासवर्गीय विधवा महिलेने आज १९ डिसेंबरच्या सायंकाळी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे आज येथील तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. तालुक्यातील निवाणा येथील ३९ वर्षीय पंचशीला बाबुराव इंगळे या विधवा महिलेने दीड वर्षापूर्वी आम आदमी विमा योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी चव्हाण नामक तलाठय़ाकडे कागदपत्रे दिली होती; मात्र त्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. शेतमजुरी करून तहसील कार्यालयात चकरा मारून थकल्यानंतर अखेर आज १९ डिसेंबरच्या सायंकाळी पंचशीला इंगळे यांनी तहसीलदार यांचे कॅबिनसमोर व्हरांड्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला; मात्र उपस्थि तांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यांनी पंचशीला इंगळे यांची समजूत काढत त्यांना आत्मदहना पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तर याचवेळी तहसीलदार यांचे कॅबिनमध्ये उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे हेसुद्धा उपस्थित होते. या घटनेमुळे तहसील परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर याबाबतची माहिती तामगाव पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोउपनि परदेशी यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी तहसील कार्यालयात येवून पंचशीला इंगळे यांना ताब्यात घेतले होते.