शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दुधा येथे वसतिगृहाच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण

By admin | Updated: March 22, 2017 01:49 IST

वसतिगृहामधील विद्यार्थ्यास वसतिगृहात जाऊन मारहाण; सात जणांना अटक

धाड(जि. बुलडाणा), दि. २१- मागील भांडणाच्या कारणावरून वसतिगृहामधील एका विद्यार्थ्यास वसतिगृहात जाऊन मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देणार्‍या साधारण ८ ते १0 जणांवर धाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी तक्रारीवरून सात जणांना अटक केली आहे. बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील जिजामाता हायस्कूलचे जिजामाता मागासवर्गीय वसतिगृह आहे. या ठिकाणी शालेय मुलांना राहण्याची सोय आहे. या वसतिगृहात राहणार्‍या विकास विलास इंगळे या विद्यार्थ्यास १९ मार्च रोजी साधारण ११ वाजता माळवंडी ता.बुलडाणा येथील आरोपी पंढरी अरविंद चव्हाण व अधिक ८ ते ९ जण वसतिगृहाच्या मैदानात चारचाकी बोलेरो क्र.एम. एच. २८ यु १९३१८ या वाहनात आले व अधीक्षकांचे कार्यालयाचे बाजूला असणार्‍या खोलीत प्रवेश करून विकास इंगळे या विद्यार्थ्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजताच अधीक्षक बद्रीनारायण भीमराव सोनुने यांनी सदरचा होणारा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपींनी मारहाण केली व आमच्यामध्ये पडल्यास जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली.  याप्रकरणी अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी यामधील आरोपी संदीप सुरडकर, मोहन चव्हाण, विशाल चव्हाण, गणेश डिगोळे, दादाराव कांबळे, शालीग्राम पिंपळे, पंढरी चव्हाण या आरोपींवर कलम ४५२, १४३, १४७, १४८, ३२३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय आर.टी.शेवाळे यांच्यासह दशरथ शितोळे, एएसआय प्रताप भुतेकर, प्रकाश दराडे, माधव कुटे हे करीत आहेत.