वरवट बकाल(जि. बुलडाणा), दि. २१- येथून १८ मार्च रोजी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्या जस्तगाव येथील आरोपीस २0 मार्च रोजी तामगाव पोलिसांनी अटक केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील आकाश भगवान वानखडे (वय १९) या तरुणाने १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वरवट बकाल येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन व लग्नाचे आमिष दाखवून भूलथापा देत जबरदस्तीने पळवून नेले होते. याप्रकरणी तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी १९ मार्च रोजी आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}