शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

५0 मीटरच्या आत खासगी वाहनांना थांबा

By admin | Updated: September 16, 2014 18:37 IST

मेहकर आगाराचे नुकसान : उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

मेहकर : येथील बसस्थानक परिसरात ५0 मीटरच्या आत खासगी वाहने थांबत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. येथे सुरु असलेल्या अवैध वाहतुकीमुळे स्थानिक आगाराचे आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत मेहकर आगाराची चांगली प्रगती असताना अवैध वाहतुकीमुळे आगाराच्या उत्पन्नात दररोज फटका बसत आहे. अवैध वाहतुकीवर कारवाई व्हावी, यासाठी आगार व्यवस्थापने ठाणेदाराला लेखी पत्रसुद्धा दिले आहे; मात्र पोलिस विभागाकडून अवैध वाहतुकीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक जोमात सुरु आहे. मेहकरवरुन रिसोड, मालेगाव, जानेफळ, चिखली लोणारसह ग्रामीण भागामध्ये काळीपिवळी, मिनीडोर, अँपे, ऑटो आदी खासगी वाहनाने मोठय़ा प्रमाणावर धावतात. स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांना तसेच वाहतूक शाखांना यासंदर्भात जाणीव असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. मेहकर आगाराला अवैध वाहतुकीचे ग्रहणच लागले आहे. आगारापासून अवैध वाहने ही २00 मीटरच्या अंतरावर असली पाहिजेत, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे; परंतु मेहकर आगारापासून सदर खासगी वाहने ५0 मीटरच्या आतच थांबतात. तर लोणार वेस, जानेफळ फाटा व पोलिस स्टेशनसमोर अवैध वाहने उभी राहत असून, प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना वाहनात कोंबले जात आहे. अवैध वाहने ही, प्रवासी निवार्‍यासमोरच खुलेआम उभी केली जात असल्याने येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे एस.टी.बसलासुद्धा उभे राहण्यास जागा नसते. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असते. आगारापासून २00 मीटरच्या आत थांबणारी व प्रवासी निवार्‍यासमोर थांबणारी अवैध वाहने हटविण्यासंदर्भात आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांनी जून महिन्यात पोलिस स्टेशनला लेखी पत्र दिले होते; परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे मात्र आगाराला मोठा तोटा सोसावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.