दोन ठिकाणी चोरी

By Admin | Updated: September 28, 2015 02:27 IST2015-09-28T02:27:35+5:302015-09-28T02:27:35+5:30

मेहकर तालुक्यातील ग्राम बेलगाव येथे दोन घरात चोरी.

Stolen in two places | दोन ठिकाणी चोरी

दोन ठिकाणी चोरी

डोणगाव (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील ग्राम बेलगाव येथे दोन घरी चोरी झाल्याची घटना २७ सप्टेंबरच्या रात्री घडली. यात अज्ञात चोरट्यांनी ५७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. बेलगाव येथील अभिमन्यू नामदेव सोमटकर हे शेतात झोपायला गेले होते. त्यांच्या घराच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील ४१ हजार ७५0 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. त्यानंतर अभिमन्यू सोमटकर यांच्याच घराशेजारी राहणारे जनार्दन नारायण वानखेडे यांच्या घरातून १५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. असा एकूण ५७ हजार ७५0 रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केला. यासंदर्भात डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गावकर्‍यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Stolen in two places