शेगावात राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेला प्रारंभ

By Admin | Updated: January 30, 2015 01:12 IST2015-01-30T01:12:15+5:302015-01-30T01:12:15+5:30

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयोजन; २६ भजन संघांचा सहभाग.

Start of State Workers Bhajan Tournament in Shiga | शेगावात राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेला प्रारंभ

शेगावात राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेला प्रारंभ

शेगाव (जि. बुलडाणा) : नका मारू पोटातील देवाघरची पेरणी, प्रेम लाभे घरोघरी कन्या जन्मली यासह स्त्रीभ्रूणहत्या विषयावरील विविध रचनांच्या सादरीकरणातून राज्यस्तरीय भजन स्पधेर्ची गुरुवारी संत नगरी शेगावात सुरवात झाली. पारंपरिक अभंगाबरोबरच स्त्रीभ्रूणहत्या या समस्येवर जागरण करण्यात आले. या स्पध्रेचे यंदा २१ वे वर्ष आहे. आ.संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. भाऊसाहेब फुंडकर हे उदघाटक म्हणुन तर प्रमुख पाहुणे म्हणुन न.प.उपाध्यक्ष ज्योतीताई मुंदडा, कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त श्रीकांत धोत्रे, मंडळ सदस्य मो. बद्रुजमा, रमेश सावरकर उपस्थित होते. श्री संत गजानन महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा आदिंच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर भजन स्पर्धेला सुरवात केली. महिला गटातील अकोला भजनी मंडळ आणि नाशिक येथील पुरुष भंजनी मंडळाने या स्पर्धेला सुरवात केली. यावेळी आ. भाऊसाहेब फुंडकर कामगार्‍यांच्या कुठल्याही समस्या भाजप शासीत राज्यात मागे राहणार नाही अशी हमी यावेळेस दिली. पुरुष गट आणि महिला गट अशा दोन गटांत सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये ३६ संघांचा सहभाग आहे.

Web Title: Start of State Workers Bhajan Tournament in Shiga