शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत तर्रर्र, प्रवाशांच्या जिवाशी खेळ; रोखण्यात आली बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 22:04 IST

खामगाव बसस्थानकात प्रवाशांनी रोखली बस, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड


खामगाव : बसस्थानकात शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी ठरली आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली एम. एच. १४ एलबी २३४४ क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी बस खामगाव बसस्थानकात थांबविली.

लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढल्यानंतर चालक व वाहक यांची संशयास्पद वागणूक, बोबडे बोलणे आणि दारूचा तीव्र वास येत असल्याने प्रवाशांनी तत्काळ जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. आमच्या जीवाची किंमत नाही का? असा सवाल करत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांकडे थेट तक्रार दाखल केली. खामगाव बसस्थानकातील उपस्थित वाहतूक नियंत्रक आणि अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली असता या बसमध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. तसेच प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे दिसून येताच नशेतील वाहक चालकांना सुरक्षित स्थळी हलविले. लांब पल्ल्याच्या प्रवासात शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. बसस्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, आश्चर्य म्हणजे तब्बल एक तास प्रवासी ताटकळत राहिले. अखेर एक तासानंतर चालक व वाहक बदलण्यात आल्यानंतरच बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. दरम्यान, याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगत, संबंधितांनी या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले.

दोन ठिकाणी बसने दिले हेलकावे -
खामगावकडे येताना मार्गावर या बसने दोन ठिकाणी अचानक हेलकावे दिल्याची माहिती प्रवाशांनी दिली. चालकाच्या असंतुलित वाहनचालनामुळे प्रवासी घाबरून गेले होते. काही प्रवाशांना थेट अपघात होणार असल्याची भीती वाटू लागली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र हा प्रकार अधिक गंभीर असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सुरक्षिततेच्या आणि शिस्तीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यधुंद चालक व वाहकांवर तत्काळ निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.खामगाव बसस्थानकावरील घटनेचे छायाचित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk ST bus driver and conductor endanger passengers; bus halted.

Web Summary : A bus driver and conductor were caught drunk in Khamgaon, endangering passengers. Alert passengers stopped the bus after noticing their behavior and smelling alcohol. Bottles of liquor were found. After a delay, replacements arrived and the bus continued.
टॅग्स :khamgaonखामगावBus Driverबसचालकpassengerप्रवासी