शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसची अँपेला धडक; आठ जखमी

By admin | Updated: May 16, 2014 00:04 IST

देऊळगावराजा चिखली मार्गावर प्रवासी घेऊन जाणार्‍या अँपेला एसटी बसने धडक दिल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले.

देऊळगावराजा : भरधाव वेगात दगडवाडीकडे प्रवासी घेऊन जाणार्‍या अँपेला एस.टी. बसने धडक दिल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात देऊळगावराजा चिखली मार्गावर सिनगाव जहागीर फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ११.३0 वाजता घडला. जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव वेगात येणार्‍या अकोला औरंगाबाद एसटी बस क्रमांक (एम एच 0६ एस ८0६८) हिने समोरुन येणार्‍या अँपे क्रमांक (एम एच २८ आर २५३२) ला सिंनगाव फाट्यासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात अँपेमधील वसंता दगडु जायभाये, बापुराव किसन घुगे, समिंद्राबाई व्यंकट बोरुडे, वासुदेव हरी जायभाये, धनंजय बबन जायभाये, कोंडाबाई हरिभाऊ घुगे, अनिल मोहन अतारे, राहणार सर्व दगडवाडी हे गंभीर जखमी झाले. हा अपघात ११.३0 वाजता झाला. या मार्गावरून माजी आ. तोताराम कायंदे येत असताना त्यांनी आपले वाहन थांबवून जखमींना तातडीने देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात स्वत:च्या गाडीने पोहोचविले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले. अँपेचा चालक अनिल अतार याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एस.टी. बस चालक विजय दौलतराव कांबळे राहणार अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.