शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बरबटली घाणीने

By admin | Updated: November 6, 2014 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार, दुर्गंधीमुळे प्रवास झाला नकोसा; स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये होणार्‍या अस्वच्छतेकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे एसटीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागासह महानगरामध्ये जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून असते. सातत्याने तिकिटाचे दर वाढले तरी केवळ महामंडळाच्या नावाने कुरकुर करीत सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसलाच प्राधान्य देतो; मात्न बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाइलाज होतो. ग्रामीण भागात धावणार्‍या एसटी बसकडे तर कोणाचेही लक्ष नसते. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येता त. ग्रामीण भागात जाणार्‍या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर हा वास सहन होत नसल्याने एसटीत उलट्या होतात. याला ग्रामीण भागात प्रवाशांनीच एक पर्यायी शब्द शोधून काढला आहे. एसटीत उलट्या होणे म्हणजे एसटी लागण असे म्हटल्या जाते. महामंडळाच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी प्रवाशांनीच आपली समजूत काढल्याचे यावरून दिसते.बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकार्‍यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या उलटीने माखलेल्या असतात. व्हेपर्स, चिप्स तसेच गुटख्याच्या पुड्या खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठय़ा प्रमाणात धूळ साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच विडी-सिगारेटचे मनसोक्त झुरके घेताना दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या अशा गाड्यांमध्ये येणार्‍या विशिष्ट दर्पाने जीव घुसमटून जातो. याकडे एसटी प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळेच गरिबांची लोकवाहिनी असलेली एसटी बस आज घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. देशभरात स्वच्छता मिशन सुरू झाले असून, एसटीनेसुद्धा मिशन स्वच्छता सुरू करण्याची गरज आहे.