शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे २0 शेड्युल रद्द

By admin | Updated: November 8, 2014 23:50 IST

मेहकर, जळगाव पाठोपाठ बुलडाण्यातही डिझेलचा तुटवडा : बसेस थांबल्या.

बुलडाणा : मेहकर व जळगाव जामोद पाठोपाठ राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा डेपोतील डिझेल संपल्यामुळे शनिवारी एसटीचे २0 शेड्युल रद्द झाले. त्यामुळे शेकडो प्रवासी दिवसभर बसस्थानकावर अडकून पडले होते. सायंकाळी डिझेलचा टँकर आल्यानंतर एसटी बसेस सुरू झाल्या. परिणामी, बसस्थानकावर प्रवाशांनी एकच झुंबड केली होती. राज्य परिवहन महामंडळ यापूर्वी खासगी डिझेल पंपावरून डिझेल खरेदी करीत होते. आता पुन्हा एसटीचे स्वत:चे डिझेल पंप सुरू झाल्यापासून एसटीला आता डेपोमध्येच डिझेल मिळू लागले आहे; मात्र दोन दिवसापासून बुलडाणा विभागात एसटीला डिझेलचा तुटवडा पडू लागल्याने एसटी बसेस दिवसभर उभ्या राहण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मेहकर डेपोमध्ये शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी डिझेलअभावी ४0 शेड्युल रद्द झाले होते. याच दिवशी जळगाव जा.डेपोमध्येसुद्धा डिझेल संपल्याने अनेक शेड्युल बंद करावे लागले होते. आज हाच प्रकार बुलडाणा डेपोमध्ये घडला. सकाळी ११ वाजता बुलडाणा डेपोमधील डिझेल संपल्यामुळे जवळपास २0 शेड्युल बंद ठेवावे लागले. त्यामुळे सकाळपासून बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना दिवसभर बसस्थानकावरच ताटकाळत रहावे लागले. चौकशी कक्षात दिवसभर प्रवाशी चौकशी करीत होते पण प्रवाशांना खरी माहिती मिळत नव्हती. अखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर एकही बस लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांचा बांध फुटला व प्रवाशांनी एकच हल्लाबोल केला. अखेर सायंकाळी डिझेलचा टँकर आल्यानंतर एसटी बसेस सोडण्यात आल्या; मात्र तोपर्यंत बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.