शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

‘मी टिळक स्मारक बोलते आहे’चे बहारदार सादरीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:55 IST

लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील टिळक स्मारक महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप सोमवारी करण्यात आला. यावेळी टिळक स्मारकाच्या शताब्दीचा इतिहास सांगणारा‘मी टिळक स्मारक बोलते आहे’या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण असलेल्या या कार्यक्रमाला टिळक स्मारक सभागृहात सायंकाळी ७ वाजता सुरूवात झाली. यावेळी शहरातील प्रसिध्द गायिका प्राजक्ता हसबनिस यांनी नांदी आणि गणेश वंदना सादर केली. मंगळा गौरीच्या खेळानंतर टिळक स्मारकासाठी योगदान असलेल्या लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली. त्यानंतर टिळक स्मारक महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात गोंधळ सादर झाला, त्यावेळी उपस्थित महिलांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टिळक स्मारक महिला मंडळाचा शंभर वर्षाचा चालता-बोलता इतिहासच या कार्यक्रमाद्वारे रंगमंचावर मांडण्यात आला.यावेळी सर्वोदय मंडळाच्या सरूताई सेवक यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टिळक स्मारक महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा भाटे, सचिव श्वेता तारे, उपाध्यक्ष ज्योती खांडेकर, सहसचिव रेखा खानझोडे, सीमा देशमुख आदींसह महिलांनी परिश्रम घेतले.सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचा उत्स्फूर्त सहभागया बहारदार कार्यक्रमात माधुरी हसबनीस, अदिती गोडबोले, रंजना मुळे, अनुजा चितळे, कविता शिंगटे, शोभा शिंगटे, मंजिरी पाटील, सीमा पाटील, सुजाता वकील, सीमा बोबडे, किरण बोबडे, श्रध्दा बोबडे, विद्याताई देशमुख, जया तायडे, अनुराधा देशमुख, मुग्धा पाटील आसावरी भडंग, गायत्री शिंदे यांनी विविध नृत्य तसेच लघू नाटीकांमध्ये सहभाग दिला. तर प्राजक्ता हसबनीस, सीमा देशमुख, विणा पाठक यांनी गीतं सादर केलीत. संगीत साथ रामदास खापरे, पराग दुबे, श्रीपाद कुळकर्णी यांनी दिली.

 

टॅग्स :khamgaonखामगावcultureसांस्कृतिक