विज्ञान खेळणी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: May 12, 2014 22:35 IST2014-05-12T22:17:09+5:302014-05-12T22:35:42+5:30

लोकमत बालविकास मंचच्यावतीने आयोजित कार्यशाळेच्या आज पहिल्याच दिवशी शहरातील बाल गोपालांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Spontaneous response to the science-work workshop | विज्ञान खेळणी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विज्ञान खेळणी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खामगाव: शहरातील बच्चे कंपनीची उन्हाळी सुटी सार्थकी लावण्यासाठी आयोजित विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लोकमत बालविकास मंचच्यावतीने आयोजित कार्यशाळेच्या आज पहिल्याच दिवशी शहरातील बाल गोपालांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक अ.खि.नॅशनल हायस्कूलमध्ये आज सोमवारी या तिन दिवशीय कार्यशाळेचा उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला हजेरी लावली. काही तरी नवीन शिकण्याची ओढ अनेकांना होती. त्यामुळे विज्ञान खेळणी शिकण्यासाठी विद्यार्थी सकाळपासूनच नॅशनल हॉयस्कूल मध्ये उपस्थित होते. या कार्यशाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सहा आकर्षक खेळणी शिकविण्यात आले. कार्यशाळेचे तज्ज्ञ शिक्षक प्रा. संदीप खरे यांचे स्वागत अतुल पंचवाटकर यांनी केले. त्यानंतर या कार्यशाळेला सुरूवात झाली. यावेळी प्राचार्या प्रविणा शहा, संजय गुरव, इवेन्ट कन्वेनर योगेश पाटील, अनिल गवई, मोहम्मद रियाज, प्रमोद कुटे आदी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रविण राऊत, संतोष देवगिरीकर,बबलू देशमुख, गणेश पिंपलकार आदींनी परिश्रम घेतले. ही कार्यशाळा आणखी दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवारी देखील घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत आणखी काही विज्ञान खेळणीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. 

Web Title: Spontaneous response to the science-work workshop