शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे मोजमाप संथ गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:04 IST

खामगाव- वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई नाफेड केंद्रावर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे.

खामगाव येथील नाफेड केंद्रावर बारदान्याची टंचाईखामगाव: हमीदराने तूर खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून आवक जवळपास बंद करण्यात आली आहे; मात्र वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई या केंद्रांवर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ ठिकाणी ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात येत आहे; मात्र मागील वर्षी तीन आकडी भाव असणाऱ्या तुरीला यावर्षी निम्मासुद्धा भाव नाही. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने गतवर्षी ज्या शेतमालाचे भाव वाढतात त्या पिकाचे उत्पादन शेतकरी भाववाढीच्या आशेने घेतात; मात्र आयात व इतर कारणांमुळे अशा शेतमालाचे भाव पडतात. अशीच शेतकऱ्यांची निराशा यावर्षी तुरीच्या पिकाने केली आहे. परिणामी कधी नव्हे तेवढी आवक हमीदर तूर विक्री केंद्रावर झाली आहे. परिमाणी अनेक शेतकरी महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून हमीदर केंद्रावर मुक्काम ठोकून आहेत. खामगाव येथील केंद्रावर अद्यापही सुमारे ३० हजार क्ंिवटल तुरीचे मोजमाप होण्याच्या प्रतीक्षेत्र आहे. मलकापूर येथील केंद्रावरही २५ हजार क्विंटल तुरीचा वजनकाटा होणे बाकी आहे. नांदुरा येथील केंद्रावर हमालांनी संप पुकारल्याने तुरीचे मोजमाप रखडले होते; मात्र आता तूर मोजणी सुरू झाली असली तरी येथेसुद्धा आलेल्या तुरीचे मोजमाप होण्यास अजूनही किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. शेगाव येथील केंद्रावरसुद्धा आतापर्यंत बारदान्याचा अभाव, व्यापाऱ्यांच्या तूर खरेदीचे आरोप यामुळे तुरीचे मोजमाप संथगतीने सुरू असल्याने येथील केंद्रावरही अद्याप तूर पडून आहे. यावर्षी जिल्हाभरात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने व भाव पडल्याने नाफेडच्या केंद्रावर लाखो क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र एकूणच वाढलेली तुरीची आवक पाहता केंद्रावर विविध समस्या उदभवत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी या केंद्रावर अनेक दिवस मुक्काम करावा लागला.