शेगाव नगरपालिकेवर मोर्चा

By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:41:36+5:302014-06-25T00:02:21+5:30

प्रलंबित शौचालयाचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी

Shegaon municipality front | शेगाव नगरपालिकेवर मोर्चा

शेगाव नगरपालिकेवर मोर्चा

शेगाव : शहरातील गड्डा, तलाव आणि खमू जमदार नगरात प्रलंबित असलेले शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे या मागणीसाठी आज या भागातील महिलांसह नागरिकांचा मोर्चा नगर परिषदेवर धडकला.
शहरातील खमू जमदार गड्डा परिसर पजावा आणि खमू जमदार नगरात सार्वजनिक शौचालय नगर पालिकेने मंजूर केलेले आहेत. या शौचालय बांधकामाचे भूमिपूजन ६ महिन्यापूर्वी पार पडले. मात्र अद्यापपर्यंत सदर काम सुरुझाले नाही. यामुळे या भागातील नागरिकांना शौचासाठी उघड्यावर बसावे लागते.यामुळे महिला वर्गास कुचंबना सहन करावी लागत आहे. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. संतप्त नागरिकांनी आज २४ जून रोजी मंगळवारी विशेषत: महिला वर्गांने नगर पालिकेत पोहचवून मुख्याधिकार्‍यांची भेट घेतली व सदर काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी करीत आपले गार्‍हाणे मुख्याधिकारी टी.जी. मुलानी यांच्यासमोर मांडले. यावेळी मुख्याधिकारी टी.जी. मुलानी यांनी बांधकाम व आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांकडून माहिती घेत सदर शौचालयाचे काम तात्काळ मार्गी लावण्याबाबतचे आदेश संबंधितांना दिले.

Web Title: Shegaon municipality front