शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मिणमिणत्या दिव्यात तिने मिळविले ८६ टक्के गुण

By admin | Updated: June 5, 2014 22:08 IST

मनिषा सिंदखेडराजा तालुक्यात वाणिज्य शाखेत मागासवर्गीयातून प्रथम

अशोक इंगळे / सिंदखेडराजा
अठरा विश्‍व दारिद्रय, वडीलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्याची कोणतीही सोय नाही, अशा विपरीत परिस्थितीतही मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून मोल मजूरी करणार्‍या आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करून साखरखेर्डा येथील एससीएस ज्युनिअर कॉलेजच्या मनिषा शिराळे हिने इयत्ता १२ वीत मिळविलेले यश हे इतरांना प्रेरणा देणारे ठरले. ८६ टक्के गुण प्राप्त केलेल्या मनिषाने वाणिज्य शाखेत तालुक्यातून अव्वल नंबर प्राप्त केला. मनिषा महादू शिराळे एक दलित चर्मकार समाजात जन्मलेली मुलगी, वर्ग १0 वीत असतांना एका लग्न समारंभातून परत येत असतांना वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. मोठी बहिण १२ वी पास आणि डिएड ला जाण्याची लगबग सुरू असतानाच एका अपघाताच्या घटनेत पित्याचं छत्र हरविले आणि हे कुटुंब मानसीकदृष्ट्या कालमडून पडले.मात्र हे दु:ख बाजूला सारून या मुलींच्या पाठीशी मायेच छत्र खंबीरपणे उभं राहिल्याने, किरण व मनिषा या दोघ्या बहिणींना जगण्याचं बळ मिळालं. राहिला प्रश्न शिक्षणाचा, लहान भावाने वडीलोपार्जीत व्यवसाय हाती घेवून बस स्थानकावर बुट पॉलीशचा व्यवसाय सुरु केला. पै-पै जमा करुन बहिणीला वेळो वेळी वह्या पुस्तके घेवून दिली. एकच खोली अन कुटुंबातील चार सदस्य अशा कठीण परिस्थितीत आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करीत ितने १२ वीच्या परिक्षेत वाणिज्य शाखेत चक्क ८६.३१ टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून तालुक्यात प्रथम आली. तिच्या शैक्षणिक कार्याचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.