शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर!    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 17:43 IST

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी एका क्विंटलला सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्याला १ लाख २१ हजार ८९० क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. दुष्काळात शेतकरी होरपळल्याने पेरणीसाठी शेतकºयांचे अर्थचक्र बिघडले आहे; त्यात आता कृषी विभाग व महाबीजने सुरू केलेली ग्राम बिजोत्पादन योजनाही शेतकऱ्यांसाठी महागडीच ठरत आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी एका क्विंटलला सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे महाबीजचे अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जिल्ह्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील एकूण खरीप हंगामाच्या नियोजनापैकी ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. ४ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व १ लाख ७४ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला खरीप हंगामाच्या पेरणीसाठी १ लाख ३९ हजार ४० क्विंटल बियाणे लागणार आहे. त्यानुसार महाबीज मार्फत ४२ हजार ८०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होत आहे. परंतू गतवर्षी सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी झळ सोसावी लागली. परिणामस्वरूप जिल्ह्याचे अर्थकारण दुष्काळात सापडले. शेतकºयांवर आलेल्या या दुष्काळी संकटामुळे यंदाच्या खरीप पेरणीसाठी लागणारे खत-बीयाणे खरेदी करणे शेतकऱ्यांसाठी डोईजड झाले आहे. बियाण्यांचे भाव गगणाला भिडल्याने अनेक शेतकरी बियाण्यासाठी पै-पै गोळा करण्यातच चिंताग्रस्त दिसून येत आहेत. कृषी विभाग व महाबीजच्या संयुक्त विद्यमाने ग्राम बिजोत्पादन योजनंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्याकरीता सोयाबीन जेएस ३३५, एमएयुएस-७१ व जेएस-९३०५ हे वाण उपलब्ध करण्यात आले आहेत. सोयाबीन जेएस - ९३०५ वाणाची विक्री किंमत ७ हजार रुपये आहे; त्यावर शेतकºयांना १ हजार ५०० रुपये अनुदान आहे. तरीसुद्धा शेतकºयांना प्रति क्विंटलमागे ५ हजार ५०० रुपये लागत आहेत. त्यामुळे दुष्काळात महाबीजचे हे बियाणे सुद्धा शेतकºयांना न परवडणारे ठरत आहेत.  दुष्काळात खिशाला न झेपणारे महाबीजचे बियाणेमहाबीज अंतर्गत अनुदानावर मिळणाºया बियाण्यांचा खर्चही दुष्काळात शेतकºयांच्या खिशाला न झेपणारा आहे. सोयाबीन जेएस - ३३५ वाणाची किंमत ५ हजार ६०० रुपये असून यावर १ हजार रुपये अनुदान आहे. त्यानुसार शेतकºयांना प्रति क्विंटलसाठी ४ हजार ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर सोयाबीन एमएयुएस -७१ या वाणाची विक्री किंमत ७ हजार रुपये असून  १ हजार ५०० रुपये अनुदान आहे. त्यानुसार शेतकºयांना प्रति क्विंटलमध्ये ५ हजार ५०० रुपये लागणार आहेत. 

 अल्पभुधारक शेतकऱ्यांची बाजाराकडे पाठअल्पभुधारक शेतकऱ्यांनी अद्यापही बाजाराकडे पाठच फिरवली आहे. यावर्षी चांगल्या पर्जन्यमानाचे  भाकीत वर्तविण्यात आले असून, मृग नक्षत्र लागून आठवडा होत असताना अद्याप एकही पाऊस दमदार झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने व खत बियाण्याला लागलेली महागाईची झळ बघता अल्पभुधारक शेतकरी बाजारात दाखल झाला नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती