शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वस्तुंची सुरक्षा धोक्यात!

By admin | Updated: December 24, 2014 00:24 IST

मातृतीर्थ राजवाडातून पंचधातूच्या तोफेची चोरी, पुरातत्त्व विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर.

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (बुलडाणा)राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातून ८५ किलो वजनाची तोफ चोरी गेल्याने मातृतीर्थ राजवाडाही असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे इतर ठिकाणच्याही ऐतिहासिक साहित्याची सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले असून, पुरातत्व विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात अनेक पुरातन वस्तू संग्रहीत आहेत. त्यात आडगावराजा येथील भुईकोट किल्ल्याचे २0 वर्षांपूर्वी उत्खनन केले असता त्या १३ एकर परिसरात पंचधातूच्या काही तोफा, तलवारी, दांडपट्टा, समया, नाणी, भांडी, जाते, दगडी शिल्प यांसह अनेक वस्तु सापडल्या होत्या. त्यापैकी काही वस्तु राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात ठेवलेल्या आहेत. दगडी शिल्प बेवारस स्थितीत ठेवलेले असून, किती शिल्प आहेत, याची नोंद संग्रहालयात नाही. तलवारी, दांडपट्टा, बंदूक यासह अनेक शस्त्र असूनही त्याची नोंद येथे नाही. दर्शनी भागात दोन पंचधातूंच्या तोफा असून, कमानीत तीन मोठी दगडी जाती, शिल्प ठेवलेले आहेत. त्या दोन तोफांपैकी एक ८५ किलो वजनाची तोफ चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना वस्तु संग्रहालयाचे लिपिक राहुल सरकटे यांच्या लक्षात आली. पुरातन वस्तुंबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अनभिज्ञता दाखविली. एकूणच वस्तु संग्रहालय किती असुरक्षित आहे, याची प्रचिती या घटनेमुळे आली आहे. राजवाड्याला चारही बाजूंनी १५ फूट उंचीच्या भिंतींची तटबंदी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व पर्यटन स्थळ व्हावे, अशीही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु पुरातन विभाग फक्त सूचना फलक लावूनच पुरातन वास्तूचे रक्षण करत असल्याचे या घटनेमुळे निष्पन्न झाले आहे. वस्तु संग्रहालयात काय पुरातन वस्तू आहेत, याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेली नाही. * २0 वर्षांपूर्वी जिजाऊ मासाहेब यांच्याविषयी जो वादग्रस्त शिलालेख तयार केला होता, तो रात्री १२ वाजता घणाचे वार करुन तोडण्यात आला होता. त्यावेळी राजवाड्याला पोलिसांचा पहारा होता. त्यानंतर पुरातन विभागाने चारही बाजूला भिंती बांधून राजवाड्याचे रक्षण सुरु केले. त्यानंतर कालौघात तेही बंद पडले. आजच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.*आंदोलनाचा इशाराचोरट्यांनाही पोलिसांचे अभय निर्माण होत आहे. त्यामुळे जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यातील तोफ चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ तपास करण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लखोजीराव जाधव घराण्याचे वंशज राजे शिवाजीराव जाधव यांनी दिला आहे.