शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

शालेय वस्तू दहा टक्क्यांनी महागल्या

By admin | Updated: May 13, 2014 21:45 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये दहा टक्कयांनी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्यातील नर्सरीतील प्रवेशासाठी तब्बल २0 हजार रुपए डोनेशन मोजावे लागत आहे.

शेगाव: इतर क्षेत्रात होणार्‍या महागाईची झळ शिक्षण क्षेत्रालाही चांगलीच बसणार असून, यावर्षी बुलढाणा जिल्यातील नामांकित शिक्षण संस्थांकडून इमारत निधी किंवा तत्सम कारणासाठी घेतल्या जाणार्‍या डोनेशनमध्ये तब्बले ५0 टक्के वाढ केली आहे. या धक्क्यापाठोपाठ पालकांना दुसरा धक्का बाजारपेठेने दिला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये दहा टक्कयांनी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्यातील नर्सरीतील प्रवेशासाठी तब्बल २0 हजार रुपए डोनेशन मोजावे लागत आहे. त्यामुळे महाग होणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वसामान्यांना खूपच महाग होणार असल्याचे चित्र दिसत आहे. साहित्याच्या किंमतीमध्ये थोडीफार वाढ होणार हे अपेक्षित असते. मात्र शाळांच्या डोनेशनमध्ये दणदणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या आणि सरकारच्या आदेशामुळे त्याला डोनेशन असा शब्द न वापरता इमारत निधी किंवा तत्सम निधी म्हटले जाते. बहुतांश पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक आहे. त्यातही शहरातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे नर्सरी किंवा ज्युनियर केजीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक शाळांमध्ये खेटे मारत आहेत. गतवर्षापयर्ंत आठ ते दहा हजार रुपए असलेली ही रक्कम यंदा २0 हजारावर गेली आहे.याशिवाय दरमहा आकारण्यात येणाया शैक्षणिक शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रवेश मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पालक याबाबत कोणताही आवाच उठवत नाहीत, हेही स्पष्टपणे दिसत आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर पालक शैक्षणिक साहित्य खरेदीस सुरूवात करतात. बहुतांश पालक शाळा सुरू होण्यापूर्वी खरेदीस प्रारंभ करतात. मात्र त्याच दरम्यान दुकानातून खचाखच गर्दी असते. त्यातच पुस्तके मिळत नसल्याने पालकांना सारख्या खेपा माराव्या लागतात. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमंतीमध्ये १0 टक्केने वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.