जानेफळ येथे बिबट्याची दहशत

By Admin | Updated: April 22, 2017 13:29 IST2017-04-22T13:29:46+5:302017-04-22T13:29:46+5:30

शुक्रवारी रात्रीच्या सुमारासबिबट दिसल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The scare of panic in Jaunfal | जानेफळ येथे बिबट्याची दहशत

जानेफळ येथे बिबट्याची दहशत

जानेफळ : जानेफळ शेतशिवारात नागरिकांना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास
बिबट दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 येथील पेनटाकळी कालव्याजवळ शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास
दुचाकीस्वारांना अमडापूर येथे जात असताना बिबट निदर्शनास पडला. मात्र
यादरम्यान आणखी वाहन आल्याने सदर बिबट तेथून पळाला. या दुचाकीस्वारांनी
सदर माहिती बस थांब्यावर थांबून गावकऱ्यांना दिली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये
भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Web Title: The scare of panic in Jaunfal