शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या कर्मचा-यांचे पगार थकले

By admin | Updated: August 14, 2015 00:22 IST

उत्पन्न कमी,खर्चच जास्त: नवनिर्वाचीत सभापतींसमोर आव्हान!

बुलडाणा : ५५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा खर्च ६0 लाखावर आहे, अजूनही १ कोटी ९ लाख रूपये विविध देणी बाकी आहेत. तर मागील ८ महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे पगार थकले आहेत. अशा परिस्थितीत नव्याने पदभार घेतलेले बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत यांना हा सर्व ताळमेळ घडून आणण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांची वर्णी लागली. गेल्या अनेक वर्षापासून अडचणीचा सामना करणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीला रुळावर आणण्यासाठी आता त्यांना आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ५५ लाख रूपये वार्षिक उत्पन्न असलेल्या बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला आस्थापनेवर ४0 लाख रूपये, प्रशासकीय पातळीवर २0 लाख रूपये, सभा खर्च दीड लाख रुपये असा ६0 लाख रुपये वर्षाला खर्च होतो. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातून नफा मिळणे तर दुरच उलट तोटाच अधिक होत आहे. त्यामुळे उपबाजारातून बाजार समितीचा दर्जा मिळूनसुद्धा मागील २0 वर्षात चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ८ लाख ८६ हजार रुपये बुलडाणा बाजार समिती देऊ शकली नाही. या बाजार समितीवर बारा कर्मचारी आहेत. आर्थिकदृष्ट्या नेहमीच डबघाईत असलेल्या या बाजार समितीच्या कर्मचार्‍यांचे मागील डिसेंबर २0१४ पासून म्हणजे आठ महिन्यांचे पगार नाहीत. त्यामुळे कर्मचार्‍यांची कौटुंबीक परिस्थिती बिकट झाली आहे. त्याचा परिणार बाजार समितीच्या कामकाजावर पडणार आहे. ६८ अडते, २९९ अ वर्ग तर ९ ब वर्ग व्यापारी आणि २७७ हमाल, ६६ मापारी तर ५ रोजंदार असलेल्या बाजार समितीची ही सगळी घडी बसविण्यासाठी, बाजार समितीला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी नवनिर्वाचित सभापती जालिंधर बुधवत यांच्या समोर आव्हानाचा डोंगर उभा ठाकला आहे.