शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रूईखेड मायंब्यात मारहाण झालेल्या महिलेला सहा लाखांची मदत

By admin | Updated: June 10, 2017 13:11 IST

शनिवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची भेट घेतली. तसंच एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 10 - रूईखेड मायंबा येथे एका महिलेला तीच्याच गावातील काही नागरिकांनी मारहाण केली होती तसंच त्या महिलेची धिंडसुद्धा काढली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची भेट घेतली. तसंच  एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली आहे. 
 
रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करून धिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी महिलेनी तिला झालेल्या मारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं महिलेने बडोले यांना सांगितलं आहे.   यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या आहेत. 
 
 "ही घटना दुर्देवी असून अशाप्रकारच्या घटना घडणं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही.  जिल्हा प्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले म्हणाले आहेत. 
यावेळी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे,  विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना,  सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडपुते, प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे उपस्थित होते.