शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

By admin | Updated: May 2, 2017 23:33 IST

मलकापूर: पाकिस्तान व दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहे. २ मे रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेधमलकापूर: पाकिस्तान व दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहे. या बाबीचा तीव्र निषेध करण्याकरिता २ मे रोजी मलकापूर शहरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भारतीय सैनिकांवर काश्मीर घाटीमध्ये व सरहद्दीवर तसेच इतर ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांद्वारा व दहशतवाद्यांकडून निंदनीय कृत्ये केली जात आहेत. ही बाब निषेधार्थ असून, याविरुद्ध मंगळवारी बसस्थानक येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेना जिंदाबाद अशी नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला. सदर मोर्चा हनुमान चौक, निमवाडी चौक, स्टेशन रोड मार्गे तहसील चौकात धडकला. तद्वतच बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहीम राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.या आक्रोश मोर्चात अ‍ॅड. अमोल अंधारेंसह जिल्हा सहसंयोजक मोहनसिंग राजपूत, बजरंग दल गौरक्षा जिल्हाप्रमुख श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल शहर अध्यक्ष दीपक कपले, उमेश बैरागी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गणेश भोपळे, गजानन ठोसर, कॅप्टन माजी सुभेदार नारायणराव डिवरे, सुरेश भोजने, दामोधर शर्मा, डॉ. विजय डागा, नगरसेवक सुहास चवरे, नगर संघचालक दामोधरदास लख्खानी, शिवसेनेचे अरुण अग्रवाल, अमोल टप, पिंटू कवळकार, आशीष माहुरकर, विजय अंबुसकर, त्रिवेदीसर, डॉ. गोपाळराव वानखेडे, कृष्णा मेहसरे, भूषण बोरसे यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हिंदू समाजप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनशहराच्या विविध मार्गांवरून हा मोर्चा निघाल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.