२३ फेर्‍यांमध्ये लागणार निकाल

By Admin | Updated: May 12, 2014 22:51 IST2014-05-12T22:46:26+5:302014-05-12T22:51:40+5:30

मतमोजणीबाबत जिल्हा प्रशासनाने आज कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले

Results for 23 rounds | २३ फेर्‍यांमध्ये लागणार निकाल

२३ फेर्‍यांमध्ये लागणार निकाल

बुलडाणा : मतमोजणीबाबत जिल्हा प्रशासनाने आज कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले असून, २३ फेर्‍यांमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आज जिल्हा नियोजन विभागाच्या हॉलमध्ये मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आयोजित केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी विस्तुत मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी बी.के. इंगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, सहायक निवडणूक अधिकारी एस.ए. खांदे, धनंजय गोंगठे, प्रभाकर भेंडे, दिनेश वानखेडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. आय.टी. आय मलकापूर रोड बुलडाणा येथे १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन यावेळी प्रथम टपाली मतमोजणीचे काम होणार आहे. ऐनवेळी कोणत्या कर्मचार्‍यास कोणते काम दयावयाचे, हे संणकाद्वारे ठरणार असून, याबाबतची रंगीत तालीम १५ रोजी घेण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगुन मतमोजणीच्या पारदर्शकतेसाठी उमेदवार तिथे उपस्थित राहणार असून, विश्‍वास निर्माण करण्यासाठी कर्मचारी यांनी शांततेत व चांगले काम करावयाचे असल्याचे स्पष्ट केले. मतमोजणीबाबत रचना, एका हॉलमध्ये १४ टेबलची रचना, मतमोजणीबाबत कायदेशीर तरतुदी, मतमोजणी निवडणूक नियम, मतमोजणी कक्षात पात्न, अपात्न व्यक्ती प्रवेश, मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणी हॉलमधील शिस्त व वर्तणूक, टपाली मताची गणना, टपाली मतपत्निकासाठी टेबल, मतदान केंद्रावर झालेल्या मतांची मोजणी, कंट्रोल युनिट नादुरुस्त झाली तर ? मतमोजणी पर्यवेक्षक यांची कर्तव्य, मतमोजणी सहायक यांची कर्तव्य, संकलन पथकांची कर्तव्य आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

Web Title: Results for 23 rounds