शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

खात्यातून दीड लाख रुपये काढून फसवणूक

By admin | Updated: May 3, 2017 00:29 IST

मलकापूर- दुधलगाव बु. येथील उपसरपंच सुरेश झनके या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदाराला अज्ञात ठगांनी तब्बल दीड लाख रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढून गंडविले आहे

मलकापूर: एटीएम कार्ड व खाते बंद होऊन त्या खात्यातील रक्कमसुद्धा काढता येणार नाही, अशी भीतीदर्शक सूचना देत एटीएम कार्डचा नंबर मिळवित दुधलगाव बु. येथील उपसरपंच सुरेश झनके या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदाराला अज्ञात ठगांनी तब्बल दीड लाख रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढून गंडविले आहे. याप्रकरणी सुरेश झनके यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.२६ व २७ एप्रिलदरम्यान अज्ञात व्यक्तीने सुरेश झनके यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत मुंबई स्थित एटीएम कार्डच्या मुख्य कार्यालयातून शर्मा बोलत असल्याची बतावणी करून बँक खात्याविषयी माहिती मिळविण्याकरिता अनामिक भीती निर्माण करीत विश्वास संपादन केला व सर्व माहिती प्राप्त केल्यानंतर त्या ठगाने २७ एप्रिल रोजी ४९ हजार ९९२ रुपये, २८ एप्रिलला ५० हजार रु., २९ एप्रिलला ४४ हजार ९९७ रुपये परस्पर काढून घेतले. दरम्यान २९ एप्रिल रोजी सुरेश झनके बँकेत खात्यातून पैसे काढण्याकरिता रांगेत उभे असतानाही खात्यात शिल्लक असलेले ३ हजार १८८ रुपयेसुद्धा त्या ठगाने काढून घेतले.सदर रक्कम ही त्या ठगाने वेगवेगळ्या ठिकाणी खरेदीकरिता काढली असल्याचेही बँक अकाउंटच्या स्टेटमेंटवरून स्पष्ट झाले आहे. फसगत झालेल्या झनके यांनी याबाबत बँकेकडे धाव घेत सदर प्रकार अधिकाऱ्यांना कथन केला असता बँक अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. या प्रकरणी सुरेश झनके यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली आहे.फसवणुकीनंतरही ‘कॉल’बँक खात्यातून पैसे काढल्यावर मोबाइलवर मॅसेज येतात; परंतु एवढ्या रकमा निघूनही झनके यांच्या मोबाइलवर मॅसेज धडकले नाहीत. तर अद्यापही तो ठग तुमचे खाते ब्लॉक झाल्याने तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम दिसत नाही. तुमचे आणखी खाते असल्यास सांगावे त्यात तुमची रक्कम फॉरवर्ड केल्या जाईल, अशी बतावणी करीत आहे.