शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘रेमडेसिविर’ची मेडिकलमधून विक्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:03 IST

Remedicivir is no longer sold through medical Shops: रेमडेसिविरच्या विक्रीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी हा निर्णय घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांचे प्रमाणही पाच हजारांवर आहे. सक्रिय रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर औषधीचा काळाबाजार रोखण्यासाठी आता या इंजेक्शनची मेडिकल स्टोअर्समधून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या औषधीचा पुरवठादारांकडून थेट कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे. रेमडेसिविरच्या विक्रीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी हा निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. कमीअधिक ११३० रुपये किंमत असलेल्या या औषधीची अलीकडे प्रचंड मागणी असल्याने बाजारात याची चढ्या भावाने विक्री होत आहे. याबात वारंवार तक्रारी येत असल्याने अखेर  जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी  मेडिकलमधून होणाऱ्या विक्रीस मनाई केली आहे. त्याऐवजी थेट कंपन्या वा स्टॉकिस्ट कोविड रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येणार आहे. 

नोडल अधिकारी नियुक्तरेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर देखरेख व सनियंत्रणासाठी दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये  जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून बुलडाणा एसडीओ राजेश्वर हांडे व अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांचा समावेश आहे. या पुरवठ्यावर देखरेख व तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्याची जवाबदारी या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस