शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी ऑक्टोबरपूर्वीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:03 IST

चालू वर्षात कापूस विक्री प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची रक्कम लवकर मिळावी, यासाठी चालू वर्षात कापूस विक्री प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी केल्याने (भारतीय कापूस महामंडळ) सीसीआयकडून खरेदी प्रक्रीयेला सुरूवात केली जाईल, बाजार समित्यांमध्ये शेतकºयांची नोंदणी होणार असल्याने खामगाव बाजार समितीकडून येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी वेबसाईटही तयार केली जात आहे. मोबाईलद्वारेही त्यावर शेतकºयांची नोंदणी होणार आहे.चालू वर्षाच्या हंगामासाठी शासनाने कापसाची आधारभूत किंमत लांब धाग्यासाठी ५ हजार ८२५ तर मध्यम धाग्यासाठी ५ हजार ५१५ रुपये निश्चित केली आहे. आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेखाली मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करावी लागणार आहे. कापूस घरात आल्यानंतर त्याची महाराष्ट्र कापूस पणन महासंघ किंवा सीसीआयला विक्री करण्यासाठी नोंदणीची पद्धत गेल्या काही वर्षात पुढे आली आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणे, तसेच उशिरा नोंदणी केलेल्या शेतकºयांना ताटकळत राहावे लागणे, यासारखे प्रकार सातत्याने घडले. हा प्रकार यावर्षी घडू नये, यासाठी कापूस शेतकºयांनी विक्रीसाठीची नोंदणी आॅक्टोबरपूर्वीच करावी, असा आदेश शासनाने दिला. त्यानुसार अनेक बाजार समित्यांमध्ये सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासूनच नोंदणीला सुरूवात झाली.खामगाव बाजार समितीमध्ये शासनाच्या आदेशानुसार कराव्या लागणाºया उपाययोजनांबाबत दोन दिवसात बैठक घेतली जात आहे.पीक पेºयाचा सात-बारा लागणारकापूस विक्रीच्या नोंदणीसाठी चालू वर्षाचा कापूस पीक पेºयासह सात-बारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, आयएफएससी कोड असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक नोंदणीकरिता आवश्यक आहेत.

शासन आदेशानुसार उपाययोजना करण्यासाठी समितीमध्ये बैठक घेतली जात आहे. त्यामध्ये केलेल्या नियोजनानुसार वेबसाइटची निर्मिती व पुढील खरेदी प्रक्रीयेची पद्धत निश्चित होणार आहे.- ओ.एस.साळुंके,प्रशासक, कृउबास, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूस