शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल दिव्या’चे पहिले मानधन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला

By admin | Updated: September 9, 2015 01:53 IST

वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांचे पाऊल; शेतक-यांना दिलासा.

बुलडाणा : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा दु:खी, कष्टी आहे. भयंकर संकटामुळे खचून गेलेले शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. शेतकर्‍यांनी स्वत:ला सावरून आपल्या लेकरांना उघड्यावर टाकून आत्महत्या करू नये, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांना मिळालेले पहिले मानधनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सर्मपित केले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर १६ मे २0१५ रोजी मुंबईवरून येत असताना चिखला येथे कर्जबाजारी झालेल्या मोहन त्र्यंबक वाघ या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची माहिती तुपकरांना समजली. त्याचवेळी त्यांनी वाघ कुटुंबाचे सांत्वन करून आपल्याला मिळणारे पहिले मानधन वाघ कुटुंबियांना देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पहिले मानधन मृत शेतकर्‍याची पत्नी राधाबाई वाघ यांच्या पदरात टाकून तुपकर यांनी पूर्ण केला. तसेच सारोळापीर येथे मधुकर रामधन बावस्कर व दुधा येथील उत्तम सोनुने या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनायक वाघ, युवा जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत, विद्यार्थी संघटनेचे चंद्रशेखर चंदन, ज्येष्ठ नेते सतीश उबाळे, कडुबा मोरे, दिलीप निकम उपस्थित होते. ना. तुपकर यांनी चिखला, दुधा, घाटनांद्रा, माळवंडी, केसापूर, भादोला व वाडी येथे दुष्काळी भागात शेतकरी व गावकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, अशी विनंती ना.तुपकर यांनी यावेळी केली.