अतिक्रमणातील जागेचीही बैठक वसुली

By Admin | Updated: January 14, 2015 23:51 IST2015-01-14T23:51:36+5:302015-01-14T23:51:36+5:30

बुलडाणा पालिकेचे दुर्लक्ष ; सुविधांच्या अभावामुळे व्यावसायिक त्रस्त.

Recovery of encroachment meeting | अतिक्रमणातील जागेचीही बैठक वसुली

अतिक्रमणातील जागेचीही बैठक वसुली

बुलडाणा : शहर परिसरातील अतिक्रमित जागेत असलेल्या व्यावसायिकांकडून पालिका बैठक कर वसुली करीत असते; मात्र त्या प्रमाणात सुविधा देण्यात येत नाहीत. अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे; मात्र त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. बुलडाणा शहर परिसरात कोणतेही मोठे व्यवसाय नसल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लहान-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून बेरोजगार आपल्या कुटुंबियांचे पालन-पोषण करीत असतात. अनेक बेरोजगार कर्जबाजारी झाले आहेत. अतिक्रमणाच्या जागेत अनेक राजकीय व्यक्ती तसेच पदाधिकार्‍यांनी दुकाने टाकली आहेत. अशा जागा सुशिक्षित बेरोजगारांना भाड्याने देऊन पदाधिकारी पैसे कमवित आहेत. या जागेसाठी बेरोजगारांना हजारो रूपये द्यावे लागत आहेत. यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाजाराच्या वसुलीचे कंत्राट खासगी तत्वावर देण्यात आले असल्याने कंत्राटदाराला नगरपालिकेच्या जागेवर बाजारासाठी दुकान मांडल्यास बैठक वसुली करण्याचा अधिकार दिला आहे; मात्र इतर ठिकाणी बाजार भरत असेल तर अशा प्रकारे वसुली करणे चुकीचे आहे. याबाबत संबंधिताला समज देण्यात येईल तसेच बाजारासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत विकास आराखडा नगराध्यक्षांच्या कल्पनेतून तयार होत असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Recovery of encroachment meeting