शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विविध करांपोटी १.८४ कोटी रुपये वसूल

By admin | Updated: March 25, 2017 02:33 IST

कर वसुलीसाठी ६0 नळ जोडणी बंद ; सात दुकानांना लावले सील

उद्धव फंगाळ मेहकर, दि. २४- मेहकर नगरपालिकेने शहरातील मालमत्ता कर व पाणीकर वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू केली आहे. मालमत्ता व पाणीकर न भरणार्‍यांच्या आतापर्यंंत ६0 नळ जोडण्या बंद केल्या असून, सात दुकानांना सील लावले आहे. मालमत्ता व पाणी करांचे जवळपास १ कोटी ८४ लाख रुपये वसुली झाल्याची माहिती नगरपालिकेने दिली आहे. शहरातील जवळपास सर्वच कुटुंबाकडे गेल्या अनेक वर्षांंपासून मालमत्ता कर व पाणी कराची मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना नळाचे पाणी, रस्ते, पथदिवे, नाल्या साफसफाई आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. त्या मोबदल्यात नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीकर भरणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून बहुतांश कुटुंबाकडे मालमत्ता व पाणी कराची मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वेळेवर वसूल होत नसल्यामुळे नगरपालिकेला विकास करण्यासह इतर कामांमध्ये अडचणी येत असल्याने मुख्याधिकारी अशोक सातपुते, सुधीर सारोळकर, संतोष राणे, अजय चैताने, विकास महाजन, संजय गिरी, रतन शिरपूरकर, विलास जवंजाळ, पूजा खरात आदींनी शहरामध्ये करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा, यासाठी न.पा.चे पथक शहरातील प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन कर भरण्यासाठी जनजागृती करीत आहे. तसेच वेळप्रसंगी सक्तीची कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. नगरपालिकेने अचानकपणे सुरू केलेल्या या सक्तीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कारण सध्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती, महागाई, पिकांना भाव नाही, मजुरांना कामे नाहीत. त्यामुळे गोरगरीब जनता हैराण आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेची धडक मोहीम ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली, तरी नगरपालिकेने आतापर्यंंत १ कोटी ८४ लाख रुपये वसुली केली आहे.