शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता

By admin | Updated: April 15, 2017 01:07 IST

शेगाव विकास आराखडा : खळवाडी अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

फहीम देशमुख - शेगावमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खळवाडीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात संस्थानच्या मालकीच्या असलेल्या अकोट रोडवरील ४.४५ हे.आर जमिनीच्या अदलाबदलीस महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरात प्रदान केली आहे. यामुळे आता येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेगाव विकास आराखड्यांतर्गत ५०० कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला आहे. मागील सात वर्षात आतापर्यंत ५० टक्के कामे झालेली असून, कामांची गती अत्यंत संथ व नागरिकांसाठी त्रासदायक असल्याने शहरवासी त्रस्त आहेत. अशातच श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने ठेवण्यासाठी १०० वर्षांपासून राहणाऱ्या खळवाडीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. गांधी चौकापासून सुरुवात होणाऱ्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दोन मोरी व बालाजी फैलापर्यंत २.६७ हे. आर. जमीन शासन श्री संत गजानन महाराज संस्थानला बहुमजली वाहन तळासाठी देण्यास तयार झाली आहे. याकरिता सर्व औपचारिकता पूर्ण झालेली असून, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महसूल व वन विभाग मंत्रालयाने ५ एप्रिल २०१७ रोजी खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात गजानन महाराज संस्थानच्या मालकीच्या शेगाव-अकोट रोडवरील भूमापन क्र. ७८७/३, ७८८/२, ७९१, ७९२, ७९३/१, ७९३/३, ७९४/१ व ७१४/१ व ७१५/१ मधील ४.४५ हे.आर. जमीन खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी अदलाबदली करण्याच्या प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.दुसरीकडे येथील नागरिकांचा पुनर्वसनाला प्रखर विरोध आहे. यामध्ये या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी कुठल्याही परिस्थितीत खळवाडीतील पुनर्वसन होऊ देणार नाही, असे जाहीर केलेले आहे. मात्र, त्यांच्याच शासनाने या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देऊ केली असल्याने आता येथील नागरिकांचे लक्ष आ.कुटे यांच्या पुढील पावलाकडे लागून आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव स.चं. मोंडकर यांनी काढलेल्या पत्रकानुसार राज्यातील सर्व संबंधित विभागाने तत्काळ पुढील कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. शेगावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी७० हजार लोकसंख्येच्या या शहरात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर असल्याने देशभरातील भाविक व आनंद सागर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या शहरात येतात. मात्र, रेल्वे स्थानक ते गजानन महाराज मंदिर याच १ कि.मी.च्या मार्गावर सर्व व्यवसाय व वर्दळ राहत असल्याने या भागातील जागांना खूप मागणी आहे. अशातच याच मुख्य मार्गालगतच्या खळवाडीची जागा शासन वाहनतळासाठी देत असल्याने नागरिकांची तीव्र नाराजी आहे. शहराबाहेरील एखादी जागा शासनाने वाहनतळासाठी द्यावी, अशी मागणी होत आहे.