शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीतील भुखंड बळकाविणारे रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 06:55 IST

MIDC News औद्योगिक वसाहतीचं सर्वेक्षण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केले जात आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील औद्योगिक वसाहतीसह अमरावती विभागातील औद्योगिक वसाहतीचं सर्वेक्षण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केले जात आहे. या सर्वेक्षणातंर्गत नियोजीत उद्देशासाठी भुखंड मिळविल्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतरही उद्योग उभारणी न करणाºयांना आता नोटीस बजावल्या जात आहेत. पहिल्या नोटीसचे समाधानकारक उत्तर न देणाºयांना दुसरीही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे एमआयडीसीतील नावालाच भुखंड बळकावणाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योजकांना उद्योगाची उभारणी करण्यासाठी भुखंड तसेच इतर सुविधा दिल्या जातात. मात्र, महामंडळाकडून दिल्या जाणाºया सुविधांचा दुरूपयोग करणाºयांच्या संख्येत गत काही वर्षांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. दरम्यान, एकीकडे युवा उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठी झटणाºयांना औद्योगिक  विकास महामंडळाकडून भुखंड मिळत नसल्याची ओरड होत असतानाच, दुसरीकडे गत अनेक वर्षांपासून भुखंड मिळाल्यानंतरही उद्योग उभारणी न करणाºयांची संख्याही मोठी आहे. औद्योगिक वसाहतीत भुखंड वाटपाची विषमता वाढीस लागल्यानंतर  आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आता अमरावती विभागातील औद्योगिक वसाहतींचे औद्योगिक विकास मंहामंडळांकडून औद्योगिक वसाहतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विहित मुदतीत उद्योगाची उभारणी न करणाºया संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उत्तर देण्यासाठी त्यांना आॅक्टोबर महिन्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत समाधानकारक उत्तर न देणारे आता औद्योगिक विकास महामंडळाच्या रडारवर आहेत.

 खामगाव येथील औद्योगिक वसाहतीत १८४ उद्योग!

खामगाव येथील औद्योगिक वसाहतीत १८४ उद्योगाची नोंद आहे. मात्र, यापैकी बहुताशं उद्योग बंद आहेत. तर गत अनेक वर्षांपासून उद्योगासाठी भुखंड घेणाºया अनेकांनी अद्यापही उद्योगाची उभारणी केली नसल्याचे धक्कादायक वास्तव औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. त्याचवेळी भुखंडाचाही विकास न करणाºयांचीही संख्या मोठी असल्याचे समजते.

 भुखंड बळकावणाºयांमध्ये राजकीय पदाधिकाºयांचा समावेश!

खामगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भुखंड बळकावणाºयांमध्ये राजकीय पदाधिकाºयांचा भरणा अधिक असल्याचे समोर येत आहे. राजकीय दबावातून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने, एमआयडीसीतील भुखंडाचा दुरूपयोग होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत असून, अनेकांनी घेतलेली आपल्या उद्योगासाठी घेतलेली जागा दुसºया उद्योजकाला भाड्याने दिल्याचेही समोर येत आहे.

 औद्योगिक वसाहतींचे सर्वेक्षण केल्यानंतर उद्योग उभारणी अथवा भुखंडांचा विकास न करणाºया संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत नोटीसचे उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न देणाºयांना दुसरी नोटीस देत, पंचनामा केला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.-रविंद्र ठाकरेविभागीय व्यवस्थापकमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अमरावती.

टॅग्स :MIDCएमआयडीसीkhamgaonखामगाव