नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST2021-04-12T04:32:19+5:302021-04-12T04:32:19+5:30

अमडापूर हे चिखली तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. या गावाशी परिसरातील जवळपास ४८ ते ५० खेडेगावांचा संपर्क येतो. याठिकाणी ...

Punitive action against those who do not follow the rules | नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अमडापूर हे चिखली तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. या गावाशी परिसरातील जवळपास ४८ ते ५० खेडेगावांचा संपर्क येतो. याठिकाणी दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व नागरिक जीवनवश्यक वस्तू खरेदीसाठी ये- जा करतात. आल्यानंतर मात्र कोविडचे नियम पाळताना दिसत नाहीत. जणू काही कोरोना संपला असल्यासारखे बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. शासनाने ठरवून दिलेले कोविड नियम पाळत नसल्याने १० एप्रिल रोजी अमडापूर पोलीस व ग्रामपंचायत कार्यालयांनी संयुक्तपणे मास्क न लावणाऱ्यांवर व ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दंड १,३०० रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी नियमांचे पालन करून तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा, गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले. या कारवाईत अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Punitive action against those who do not follow the rules