शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा संप : शिवसेना, किसानसेनेने रस्त्यावर ओतले दुध

By admin | Updated: June 1, 2017 20:07 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देत शिवसेनाप्रणित किसान सेनेच्यावतीने सकाळी ८ वाजता बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दुध ओतून समर्थन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यासाठी १ जूनपासून शेतकऱ्यांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठींबा देत शिवसेनाप्रणित किसान सेनेच्यावतीने सकाळी ८ वाजता बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दुध ओतून समर्थन देण्यात आले.शिवसेनेचे नेते खासदार तथा संपर्क प्रमुख प्रताराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शिवसेना नेते संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून रस्त्यावर दुध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेती मालाल हमीभाव द्या, दुधाला योग्य दर मिळालाच पाहिजे, भाजीपाल्याला योग्य दर मिळाला पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला. यावेळी बुलडाणा शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून काही वेळांनी किरण पाटील, विजय सोनुने, निलेश बारोटे, सतिष जगताप, गजानन उबरहंडे, अनिल उबरहंडे, रवि उबरहंडे, नंदु उबरहंडे, निलेश काकडे, दिपक काकडे, जगन्नाथ उबरहंडे, गजानन जाधव, दिनकर उबरहंडे, प्रदिप उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेसचे समर्थनराज्यासह जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटाने घेतला असताना त्याला तातडीची मदत देण्याऐवजी पोकळ आश्वासनांचा मारा संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे भ्रमनिरास झाल्याने राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते संपाचे हत्या उपसले आहे. त्याला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहूल बोंद्रे यांनी केले आहे.