गणेशमूर्ती विटंबना प्रकरणाचे पडसाद

By Admin | Updated: October 2, 2015 02:16 IST2015-10-02T02:16:27+5:302015-10-02T02:16:27+5:30

खामगाव शहरात धिक्काराचे फलक लागले, मनसेच्यावतीने क्षमापूजन कार्यक्रम.

The problem of Ganesh idol sin | गणेशमूर्ती विटंबना प्रकरणाचे पडसाद

गणेशमूर्ती विटंबना प्रकरणाचे पडसाद

खामगाव : विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती डम्पिंग ग्राउंडवर कचर्‍यात टाकण्यात येऊन धार्मिक भावना दुखावल्याच्या ओमप्रकाश शर्मा यांच्या फिर्यादीवरून मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष व इतरांविरुद्ध ३0 सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी या घटनेचे पडसाद शहरात उमटून धिक्काराचे फलक शहरात लावण्यात आले आहेत. सदर फलक शहरातील गांधी चौक, शिवाजी चौक, मोहन चौक, वामननगर चौक, जलंब नाका या परिसरात लावण्यात आले आहेत. मनसेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डम्पिंग ग्राउंडवर क्षमापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, क्षमापूजन करून आरती करण्यात येणार आहे. गणेशमूर्ती विसजिर्त करणार्‍यांना यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेचे बाबा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Web Title: The problem of Ganesh idol sin