शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, उपाध्यक्षपदामुळे मलकापूरची सरशी!

By admin | Updated: March 22, 2017 01:59 IST

कार्यकर्त्यांचा जल्लोष; मलकापूरात शहरातून निघाली मिरवणूक.

मनोज पाटील मलकापूर, दि. २१- मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा जिल्हा परिषदेत २१ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टेकूने भारतीय जनता पक्षाने नव्या राजकीय इतिहासाचा अध्याय रचला. अनपेक्षित व तेवढय़ाच धक्कादायकरीत्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी उमा तायडे व उपाध्यक्षपदी मंगला रायपुरे यांना विराजमान करीत दोन्ही महत्त्वाची पदे मलकापूरच्या या जिजाऊंच्या लेकींच्या हाती देत भाजपानेही सत्ता स्थापनेचा पहिला मान हा काँग्रेसप्रमाणे या मलकापूर नगरीलाच दिला. त्यातही महत्त्वाचे म्हणजे उपाध्यक्षपदही याच विदर्भाचे प्रवेशद्वारी देत भाजपाने काँग्रेसमुळे सरशीच दाखविली आहे.६५ वषार्ंच्या कालावधीत १२ ऑगस्ट १९६२ रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसने मलकापूरचे बी.के.पाटील यांना दिला होता. दरम्यानच्या काळात आतापर्यंत २0 पैकी १७ जि.प. अध्यक्ष हे घाटावरचेच राहिलेत. उर्वरित तीन वेळाही अध्यक्षपद हे घाटाखाली; पण सीमेवरच्या भागातच देण्यात आले. बी.के.पाटील यांच्यानंतर जि.प. च्या इतिहासात दरम्यानच्या काळात या मलकापूरकडेही कधीही अध्यक्षपद अर्थातच अध्यक्षपदाचा लाल दिवा झळकला आहे. याच बाबीला हेरत यावेळी काहीही करून अध्यक्षपद मलकापूरला आणायचेच, हा चंग भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती यांनी मनी बांधला होता. त्यादृष्टीने राजकीय असे पुरक वातावरण निर्मितीही झाली. ज्या काँग्रेसने मागीलवेळी उमा तायडे यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवले, त्याच उमा तायडे यांना भाजपाने जि.प.ची सत्ता हाती घेत जि.प. च्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान देत खर्‍या अर्थी त्यांचा म्हणजेच मातृशक्तीचा सन्मानच केला आहे. राजकीय अंदाजांना फोल ठरवित आजची ही निवड झाली आहे. दोन्ही पदे मलकापूरलाच? या प्रश्नाने अनेक राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसने प्रथम सत्ता स्थापनेच्या वेळी पहिला अध्यक्षपदाचा मान मलकापूरला दिला होता, तर भाजपाने सत्ता स्थापनेचा पहिला मान हा अध्यक्षपदासह उपाध्यक्षपदही मलकापूरलाच देत खर्‍या अर्थी मलकापूरचा बहुमान वाढविला आहे. हेच आजच्या निवडीवरून स्पष्ट होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.