शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव रोडवरील झाडे सुकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:44 IST

खामगाव : ऐन उन्हाळ्यात पाणी देणे थांबवल्याने शेगाव रोडवरील सुमारे २ हजार झाडे सुकत चालली आहेत.

पाणी देणे सोडल्याने शेवटची घटका मोजत आहेत झाडे खामगाव : शेगाव रोडवरील सुमारे २ हजार झाडे शेवटची घटका मोजताना दिसत आहेत. रस्ता रुंदीकरण कामात ही झाडे जाणार असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून ऐन उन्हाळ्यात या झाडांना पाणी देणे थांबवल्याने झाडे सुकत चालली आहेत. सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने शेगाव रोडवर दोन-तीन वर्षाअगोदर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. या झाडांना नियमीत पाणी देवून जगविण्यातही आले. यावर लाखो रुपयांचा खर्च झाला. ही झाडे चांगली पुरुषभर उंचीची झालेली असून भविष्यात चांगली वाढली असती. परंतु खामगाव-शेगाव मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित होवून त्याचे तीनपदरीकरणाचे कामही केंद्र शासनाकडून मंजूर झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या या कामात झाडांचे बलिदान जाणे निश्चित आहे. सदर बाबीमुळे या झाडांच्या संगोपनाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात आले असून पाणी देण्याचे काम थांबविलेले आहे. त्यामुळे ही झाडे पार सुकली असून आजच दम तोडत असल्याचे दिसून येते. चांगली जगलेली झाडे सुकल्याचे पाहून पर्यावरण व निसर्गपे्रमी मात्र दु:ख व्यक्त करताना दिसतात. सदर झाडे तोडलीच जाणार असल्याने आत सुकू दिली तरी भविष्यात पुन्हा लागवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वारकऱ्यांसाठी झाडांची आवश्यकता शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची खामगाव-शेगाव रोडवर नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे भाविकांना विसाव्याकरिता सावलीची गरज भासते. कोणत्याही रस्त्यावर नसेल एवढी झाडांची या रस्त्यावर गरज आहे. त्यामुळे येथील झाडे सुकू न नष्ट होत असतील किंवा तोडली जात असतील तर ते पुन्हा लावणेही गरजेचे आहे.पर्यावरणासोबतच आर्थिक हानीशासनाकडून पर्यावरणाच्या नावाखाली नेहमी वृक्षलागवडीचे मोठ-मोठे उपक्रम राबविले जातात. त्यावर पैसा ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तीच झाडे तोडली जातात. रस्ता बांधल्यानंतर पुन्हा एकदा वृक्षारोपण केलेच जाईल. त्यामुळे झाडे लावणे व तोडण्याच्या या उरफाट्या कामात पर्यावरणासोबतच आर्थिक हानी होत असल्याचे दिसून येते.