शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस अँप ग्रूपमधील सदस्याला अटक

By admin | Updated: September 21, 2014 00:37 IST

बोराखेडी पोलिसांची कारवाई : आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे भोवले.

मोताळा (बुलडाणा) : स्मार्ट फोनमुळे व्हॉटस् अँपधारकांची संख्या वाढत असून, व्हॉटस् ग्रूप तयार करून त्यावर विविध प्रकारच्या माहितीसह मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरूणवर्गामध्ये मोठे फॅड आलेले आहे; मात्र व्हॉटस् अँपच्या उपयोगीतेबरोबरच त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसून येत आहे. भविष्यात उद्भवणार्‍या परिणामांची पुसटशी कल्पना व कायद्याचे ज्ञान नसलेल्या अशाच एका ग्रूप सदस्यावर आज २0 सप्टेंबर रोजी त्यास पोलिस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.मयूर भावसार रा. बर्‍हानपूर (मध्यप्रदेश) वय २४ असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् ग्रू पमधील सदस्याचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी शफी शाह मुसा शाह वय ३५ रा. कोथळी यांच्या व्हॉटस् अँप ग्रूपमधील ९५४५७00५८६ या मोबाईल क्रमांकावर बर्‍हानपूर येथील मयूर भावसार या युवकाने ९१७९५५५६४६ या मोबाईल क्रमांकावरून धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर पोस्ट केला. सदर आक्षेपार्ह मजकूर १९ स प्टेंबरच्या रात्री १0 वाजता व्हॉटस् अँपवर पोस्ट करण्यात आला होता. याबाबतची तक्रार शफी शाह यांनी १९ सप्टेंबर रोजी रात्री बोराखेडी पोलिस स्टेशनला दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून रात्रीच बर्‍हानपूर येथे जावून आरोपी मयूर भावसार यास अटक करून, त्याच्याविरूद्ध कलम ६६ अ २९५ भादंविनुसार सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोराखेडी पोलिसांच्या या कारवाईमुळे व्हॉटस् अँपधारकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, जे ग्रू प अँडमिन असतील त्यांनी बनविलेला ग्रूप डिलीट करणे व इतरांच्या ग्रूपमधून स्वत:ला लेफ्ट करणे हाच कार्यक्रम व्हॉटस् अँपधारकांचा दिवसभर सुरू होता.