शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणार्‍यांना दंड

By admin | Updated: May 16, 2014 00:04 IST

जलंब येथे विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार २00 असा एकूण २४ हजार ८00 रुपये दंड वसूल.

जलंब : विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार २00 असा एकूण २४ हजार ८00 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई माटरगाव येथील मंडळ अधिकारी पदमने यांनी आज १५ मे रोजी केली. हिंगणा परिसरातील पूर्णा नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात विनारॉयल्टी रेतीची वाहतूक केल्या जात आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आज १५ मे रोजी माटरगावचे मंडळ अधिकारी पदमने, कठोरा येथील तलाठी विश्‍वनाथ उबरहंडे, माटरगावचे तलाठी देशमुख व चोपडे आदींच्या पथकाने विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणार्‍यांवर पाळत ठेवली. यादरम्यान विठ्ठल देवीदास काळे रा.कालवड यांचे एम.एच.२८- ९६७0, विठ्ठल मधुकर देशमुख रा.अलमपूर ता.नांदुरा यांचे एम.एच.२८ टी ५२४५, संजय सदाशिव कवरे रा.कालवड यांचे एम.एच.२८ ई ५१६७, महादेव शालिग्राम मिरगे रा.जलंब यांचे एम.एच.डी. ५८६८ या ट्रॅक्टरने रेतीची एकाच रॉयल्टीवर अवैधरीत्या उत्खनन करुन वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे मंडळ अधिकारी पदमने यांच्या पथकाने उपरोक्त क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जलंब पोलिस स्टेशनला लावण्यात आले; तसेच विनारॉयल्टी रेतीच्या चोरीप्रकरणी प्रतिट्रॅक्टर १ ब्रास याप्रमाणे प्रत्येकी ६ हजार २00 रुपये दंड भरण्याचे सांगितले. त्यामुळे उपरोक्त ट्रॅक्टरधारकांनी प्रत्येकी ६ हजार २00 याप्रमाणे एकूण २४ हजार ८00 रुपये दंड महसूल जमा केला. त्यानंतर चारही ट्रॅक्टर सोडून देण्यात आले.