शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी

By admin | Updated: May 3, 2017 00:34 IST

मलकापूर: स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क चिमुकल्या रुग्णाच्या अंगावर चालता पंखा पडल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली.

मलकापूर: स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क चिमुकल्या रुग्णाच्या अंगावर चालता पंखा पडल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. यात नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील जनरल वार्डमध्ये मधुकर निनाजी गणगे, नेहा सुकदेव म्हासकर, स्वाती नितेश खराडे, अलका शंकर केणे आदी उपचारासाठी दाखल आहेत. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरू असलेला पंखा अचानक खाली पडला. यामुळे नेहा सुकदेव म्हासकर (वय ७) रा. काटी ही हाताला मार लागल्याने जखमी झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची वार्ता कळताच नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची व इतर रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयात उपस्थित प्रशासनाच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त झालेले पंखे, लाइट, दरवाजे, खिडक्या तत्काळ बदली करा, त्याचबरोबर रुग्णालयात मूत्रीघर व शौचालयात स्वच्छता कायमस्वरूपी ठेवा, अशा आशयाची मागणी नगराध्यक्ष अ‍ॅड. रावळ यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली. त्याचबरोबर सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा रावळ यांनी दिल्याने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे.