शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री शिक्षक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: January 8, 2015 01:14 IST

भाडोत्री शिक्षक कार्यरत असल्याची बाब ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड; प्रशासनात एकच खळबळ.

बुलडाणा : देऊळघाट येथील परिषदेच्या शाळेवर भाडोत्री शिक्षक कार्यरत असल्याची बाब ह्यलोकमतह्ण ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मुख्यकार्यपालन अधिकारी देशमुख यांनी ह्यलोकमतह्णचे वृत्त वाचताच सकाळीच शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना याबाबत सूचना दिल्या. आज बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवसभर बैठकांचे सत्र असल्यामुळे शिक्षणाधिकारी ठग यांनी बुलडाणा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयङ्म्री बोर्डे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बोर्डे व केंद्रप्रमुख संजय पवार यांनी शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. यासंदर्भात जयङ्म्री बोर्डे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, शाळेवर जाऊन मुख्याध्यापकांकडून या प्रकरणात लेखी घेतले आहे; तसेच विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा अहवाल शिक्षणाधिकारी यांना देणार असून, यासंदर्भात आताच बोलणे उचीत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अपंग समावेशीत शिक्षण योजना बंद झाली असून, या योजनेच्या नावाखाली भाडोत्री शिक्षक नेमण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीअंती दोषीवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगीतले. * मुख्याध्यापकांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांची चौकशीदेऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी.डी.वायाळ यांच्या निर्देशावरूनच भाडोत्री शिक्षकाची शिक्षण सेवा सुरू होती, तसेच वायाळ यांच्याकडे असलेले विषय सदर शिक्षक शिकवित होता. लोकमतच्या चमूने १0 अ या वर्गात सदर भाडोत्री शिक्षक शिकवीत असल्याचे कॅमेराबद्ध केले होते; मात्र आज शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठविलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी जयङ्म्री बोर्डे यांनी प्रभारी मुख्याध्यापक वायाळ यांच्या समक्षच विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्याची माहिती आहे. आम्हाला वायाळ सरच शिकवित होते, असे अर्ज आज विद्यार्थ्यांकडून भरून घेतल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ज्यांच्या विरोधात चौकशी आहे त्यांच्याच उपस्थितीत चौकशी होत असेल तर या प्रकरणात दोषींना वाचविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन काम करीत असल्याची शंका व्यक्त होत आहे.