शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाविरुध्दचा सक्तीच्या सेवानिवृत्तीचा आदेश विभागीय आयुक्तांकडून रद्द

By admin | Updated: July 5, 2017 13:44 IST

वारंवार संधी देवूनही जिल्हा परिषदेने आपली बाजू मांडली नसल्याचा ठपका ठेवत सदर आदेश रद्द करण्यात आला आहे.

मलकापूर : ग्रामपंचायत सचिवालयाच्या इमारतीवर मूल्यांकनापेक्षा जास्त खर्च केल्याप्रकरणी ग्रामसेवक डाबेराव यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला. याप्रकरणात वारंवार संधी देवूनही जिल्हा परिषदेने आपली बाजू मांडली नसल्याचा ठपका ठेवत सदर आदेश रद्द करण्यात आला आहे. शेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक बी.जी. डाबेराव यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामसेवक सचिवालय इमारतीवर बांधकाम मूल्यांकनापेक्षा जास्त खर्च केला होता. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डाबेराव यांना ५ जुलै २०११ रोजी सक्तीच्या सेवानिवृत्तीचा आदेश देत त्यांच्याकडून मूल्यांकनापेक्षा जास्त झालेल्या खर्चाची रक्म वसूल करण्याचे आदेशही दिले होते. या आदेशाविरुध्द २० जुलै २०११ रोजी डाबेराव यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेची बाजू मांडण्यासाठी वेळोवेळी संधी देण्यात आली. परंतु जिल्हा परिषदेने आपली बाजू मांडली नाही, असा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या सेवानिवृत्तीचे आदेश रद्द ठरविले. तसेच डाबेराव यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पुनर्स्थापना देण्यात यावी व ५ जुलै २०११ पासून बंद केलेल्या त्यांच्या तीन वेतनवाढी वसुलपात्र ठरवून सदर रक्कम शासनाच्या निर्देशानुसार जबाबदारी निश्चित करुन कारवाई करावी, असेही विभागीय आयुक्तांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.