शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती महामार्गाला विरोध, शेतकऱ्यांचा रास्तारोको; चिखलीत आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प

By दिनेश पठाडे | Updated: July 4, 2024 13:19 IST

 प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये यासाठी गेल्या साडेचार महिन्यापासून महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत.

बुलढाणा : प्रस्तावित सिंदखेड राजा-शेगाव भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन छेडले जात आहे. ४ जुलै रोजी चिखली येथे महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने खामगाव चौफुली येथे सकाळी रास्तारोको करण्यात आला. नागपूर,पुणे व जालना, मलकापूर राज्य मार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी २ तास रोखून धरली होती.

 प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये यासाठी गेल्या साडेचार महिन्यापासून महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत.

भक्ती महामार्ग निर्मीतीला बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांकडून  विरोध केला जात असताना सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भक्ती मार्ग बाधित शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.  चिखली येथे करण्यात आलेल्या  आंदोलनात महामार्ग बाधित शेतकऱ्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते व कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना( उबाठा), स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे सह राजकीय पक्षातील पदाधिकारी सुद्धा  सहभागी झाले होते. कोणतीही मागणी नसताना गरज नसलेला हा महामार्ग करून शेतकऱ्याना भूमिहीन करू नये या मागणीला  सक्रीय पाठींबा दिला. शेती व शेतकरी वाचविण्यासाठी आम्ही कायम शेतकऱ्याच्या सोबत राहू त्यासाठी वेळ प्रसंगी सरकारने आमच्या वर गुन्हे दाखल केले तरी ते सहन करू असा आक्रमक पवित्रा या वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतला.   रस्ता रोको दरम्यान चिखलीतून जाणाा-या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहने अडकून पडल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. या रस्ता रोको दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिखली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

या वाहनांना दिली वाट मोकळी करून

  चिखली येथे खामगा्व चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे,नागपुर, तसेच मलकापुर, सोलापुर, बुलढाणा, जालना या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी रूग्णवाहिका, स्कूल बस तसेच विविध परिक्षांकरीता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणा-या परिक्षार्थींच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.