एक लाख पशुधनासाठी फक्त १0 रुग्णालय

By Admin | Updated: December 22, 2014 00:48 IST2014-12-22T00:48:29+5:302014-12-22T00:48:29+5:30

पशुपालकांची कसरत : खासगी डॉक्टरांचा घ्यावा लागतो आधार.

Only 10 hospitals for one lakh livestock | एक लाख पशुधनासाठी फक्त १0 रुग्णालय

एक लाख पशुधनासाठी फक्त १0 रुग्णालय

मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त आहे. तालुक्यात लहान, मोठय़ा व शेळया-मेंढय़ा अशा पशुधनाची संख्या १ लाख ७ हजार ९६३ आहे; मात्र या पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या केवळ १0 इतकी आहे. यामुळे पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील सर्वच गावामध्ये पशुधनाची दखलपात्र संख्या असून, ५0३७६ लहान-मोठी जनावरे व ५७५९७ शेळय़ा मेढय़ांची संख्या आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नोंदीनुसार, तालुक्यात उपरोक्त प्रवर्गाची एकूण १ लाख ७ हजार ९६३ इतकी प्रचंड पशुधनाची संख्या आहे. मात्र लाखाच्यावर पशुधनाची संख्या असतांना, या पशुधनाची काळजी घेण्यासाठी तालुक्यात केवळ १0 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मो ताळा, धामणगाव बढे, तपोवन व पिंपळगाव देवी या ठिकाणी ङ्म्रेणी १ चे दवाखाने असून, ङ्म्रेणी २ चे दवाखाने शेलापूर, शेलगाव बाजार, कुर्‍हा, तरोडा, राजूर व रोहिणखेड या ठिकाणी आहेत. पशुधनाच्या संख्येत दवाखान्याची संख्या अल्प असल्यामुळे आणि रिक्त पदांमुळे वैधकीय सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने बरेचदा खाजगी पशुवैद्यकांचा पशुपालकांना आधार घ्यावा लागतो. तालुक्यातील पाच दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकाची पदे रिक्त असल्याने जनावरासह पशु पालकांची गैरसोय होत आहे. तालुक्यात पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकासह पदांची संख्या दहा आहे. तालुक्यातील पशुधनाची काळजी घेण्यासाठी ङ्म्रेणी १ चे चार व ङ्म्रेणी २ चे सहा दवाखाने आहेत. ङ्म्रेणी एकच्या महत्त्वाच्या पदांपैकी मोताळा, धा. बढे व तपोवन येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे पद अनेक महिन्यां पासून रिक्त आहे, तर पिंपळगाव देवी येथील पद येत्या एक महिन्यात रिक्त होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चारही पद रिक्त असणार आहे. ङ्म्रेणी दोनच्या पदांपैकी कुर्‍हा येथील पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त असल्याने त्या परिसरातील शेकडो जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्याचबरोबर ङ्म्रेणी एकच्या दवाखान्यामध्ये मोताळा व तपोवन येथे काही महिन्यांपासून, तर धामणगाव बढे येथे काही वर्षापासून पशुधन विकास अधिकार्‍यांची नियुक्तीच नसल्याने पशुपालकांना नाइलाजास्तव खाजगी डॉक्टरांकडून पशुंवर उपचार करून घ्यावे लागत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने तालुक्याकडे लक्ष देवून रिक्तपदे त्वरित भरण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.

Web Title: Only 10 hospitals for one lakh livestock