एक लाखाची बनावट विदेशी दारु जप्त

By Admin | Updated: May 20, 2014 00:40 IST2014-05-20T00:35:26+5:302014-05-20T00:40:03+5:30

खामगाव तालुक्यात गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाखाची नकली विदेशी दारु पकडून आरोपींना अटक केली.

One lakh rupees fake foreign liquor seized | एक लाखाची बनावट विदेशी दारु जप्त

एक लाखाची बनावट विदेशी दारु जप्त

खामगाव : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल १८ मे रोजी रात्री दरम्यान माटरगाव ते चांगेफळ रोडवर भेंडवळ गावाजवळ सापळा रचून १ लाखाची नकली विदेशी दारु पकडून आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. तसेच आरोपींच्या ताब्यातून विदेशी दारु, मालवाहू वाहनासह मोबाईल असा एकूण ७ लाख १४ हजार ४0 रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यात नकली विदेशी दारुचा पुरवठा होत असल्याची माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ मे रोजी रात्री दरम्यान जळगाव जामोद येथील माटरगाव ते चांगेफळ रोडवर भेंडवळ गावाजवळ सापळा रचून महिंद्रा बोलेरो क्र. एम.एच.१९ एक्स ५२८३ या संशयीत वाहनातून १३ बॉक्समध्ये विदेशी दारुच्या ६२४ बाटल्या (८१,१२0 रु.) इतर २ बॉक्समध्येही विदेशी दारुच्या ९६ बाटल्या (१५ हजार ३६0 रु.) तसेच विदेशी दारु (४८00 रु.) चा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: One lakh rupees fake foreign liquor seized