शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

By admin | Updated: March 28, 2017 01:39 IST

एसटी महामंडळाचा उपक्रम; गर्दी तेथे एसटी संकल्पना येणार प्रत्यक्षात.

अनिल गवई खामगाव, दि. २७- तोट्यातील 'एसटी'ला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, खामगाव आगाराकडून आता सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणीही थेट एसटीची सेवा देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. 'हात दाखवा, एसटी थांबवा' या उपक्रमाच्याच धर्तीवर '४0 प्रवासी जमवा, एसटी बोलवा' या अभियानाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्यापासून रोवल्या जाणार असल्याची माहिती आहे.एसटी महामंडळाच्या दररोज जवळपास १४ हजार ९00 फेर्‍या तोट्यात धावत असून, या फेर्‍यांमुळे वर्षाला २४0 कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ३७ हजार ४१७ खेडेगावांसह शहरी भागातील प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधेचाही समावेश असून,आता अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी थेट एसटी पाठविण्याची अंमलबजावणी एसटी महामंडळाकडून केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्दी आणि यात्रेच्या ठिकाणी एसटीची विशेष सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खासगी प्रवासी वाहतुकीला बसणार आळा!४शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते; मात्र राज्यातील ग्रामीण भाग आणि खास करून दुर्गम भागात ह्यबंधनकारकह्ण सेवा देताना एसटी महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. दरम्यान, राज्यातील सुमारे ७ हजार मार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा आहे. या अवैध वाहतुकीमुळे बाधित झालेल्या मार्गावरील आर्थिक तूट भरून काढण्यासाठीचा एक भाग म्हणून आगामी काळात ह्यगर्दी तेथे एसटीह्ण हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.एक कॉल करा, बस मिळवा!४प्रवासी वाढवा अभियानांतर्गत अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी खामगाव आगाराला माहिती दिल्यास, एस टी बसची सुविधा दिली जाणार आहे. जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी बससोबतच पर्यायी व्यवस्थाही करून दिली जाणार आहे. यामध्ये अधिक प्रवासी हाच निकष वापरण्यात येणार असल्याने, शटल सर्व्हिसचाही वेळेवर रूट चेंज करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.