शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आता एसएमएसद्वारे करता येणार पालिकेकडे तक्रार

By admin | Updated: May 3, 2017 00:21 IST

जळगाव जामोद : जळगाव जामोद नगर परिषदेने महाराष्ट्र दिनापासून एसएमएसद्वारे तक्रार करण्याची व तक्रार निवारण करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे.

कॅशलेसच्या दिशेने वाटचाल : पीओएस मशीन केली कार्यान्वितजळगाव जामोद : जळगाव जामोद नगर परिषदेने महाराष्ट्र दिनापासून एसएमएसद्वारे तक्रार करण्याची व तक्रार निवारण करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. तसेच कॅशलेस व्यवहारासाठी नगर परिषदेने १ मे पासून पी.ओ.एस. मशीनसुद्धा नगर परिषदेमध्ये कार्यान्वित केली आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी भाजपाचे प्रदेश महामंत्री आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सीमाताई डोबे, न.प. उपाध्यक्ष मांगीलाल भंसाली, शहराध्यक्ष प्रकाश बगाडे, नगर परिषदचे बांधकाम सभापती नलुताई भाकरे, नियोजन सभापती अनिता कपले, आरोग्य सभापती सविता खवले, महिला व बालकल्याण सभापती जयमाला इंगळे, शिक्षण सभापती उषाताई धंदर, नगरसेविका पार्वताबाई कोथळकार व रत्नप्रभा खिरोडकर, नगरसेवक शैलेंद्र बोराडेव, नीलेश शर्मा, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, नगरसेविका चित्राताई इंगळे यांची उपस्थिती होती, तसेच यावेळी जळगाव जामोद शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या महिला बचत गटातील भगिनींचा व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. पीओएस मशीनच्या मदतीने नागरिकांना एटीएमद्वारे आपल्या कराचा भरणा करता येईल. त्यामुळे नगर परिषद आता कॅशलेसकडे वाटचाल सुरू झाली आहे; तसेच जळगाव जामोद शहर स्मार्ट करण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचा लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना आ.डॉ.संजय कुटे यांनी दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी नगराध्यक्ष सीमाताई डोबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक लोकेश शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष अजय वंडाळे, कैलास डोबे, शरद खवणे, रमेश कोथळकार, अरूण खिरोडकार, अनिल कपले यांची उपस्थिती होती.