पुलकुंडवार नवे बुलडाणा जिल्हाधिकारी; जि.प.सीईओपदी षण्मुखराजन

By Admin | Updated: April 23, 2017 01:06 IST2017-04-23T01:06:34+5:302017-04-23T01:06:34+5:30

जिल्हाधिकारी झाडे , सीईओ मुधोळ यांची बदली

The new Buldhana Collector of Palkundwara; Prakashpatarajan of Z.P.E.E.O. | पुलकुंडवार नवे बुलडाणा जिल्हाधिकारी; जि.प.सीईओपदी षण्मुखराजन

पुलकुंडवार नवे बुलडाणा जिल्हाधिकारी; जि.प.सीईओपदी षण्मुखराजन

बुलडाणा: जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांची शनिवारी बदली झाली. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकुंडवार नवे जिल्हाधिकारी म्हणून बुलडाणा येथे रुजू होणार आहेत. शनिवारी राज्यातील आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. डॉ. विजय झाडे गत दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची क्रीडा विभागात आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तसेच जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांची औरंगाबाद येथे कर विभागात सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. दीपा मुधोळ यांच्या जागी धारणी येथील उपविभागीय महसूल अधिकारी षण्मुखराजन एस यांची बदली झाली आहे. दीपा मुधोळ यांनी दोन वर्षात जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्याकरिता प्रयत्न केले. त्यांनी शिक्षकांना विविध उपक्रमसाठी प्रोत्साहित केले. तसेच हगणदरीमुक्त मोहीमही त्यांनी राबविली. क्रीडा महोत्सवात कर्मचार्‍यांसोबत विविध खेळांमध्येही त्यांनी सहभाग नोंदविला होता.

Web Title: The new Buldhana Collector of Palkundwara; Prakashpatarajan of Z.P.E.E.O.