नांदुरा- मलकापूर एसटीला भरधाव ट्रॅक्टरची धडक ; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:38 IST2018-02-08T00:38:34+5:302018-02-08T00:38:55+5:30
मलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली.

नांदुरा- मलकापूर एसटीला भरधाव ट्रॅक्टरची धडक ; एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एसटी क्र.एमएच 0६/एस ८0३६ नांदुरा तालुक्यातील काटी येथून मलकापूरकडे शहरात आली होती. पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर विरुद्ध दिशेने भरधाव ट्रॅक्टर येऊन एसटीवर आदळला. हे ट्रॅक्टर हायड्रोलीक फ्रोकचे होते. त्याचे समोरील दाते एसटीच्या काचावर आदळल्याने काचा फुटून एसटीचालक श्रीकृष्ण सुकदेव काटे (वय ५६) रा.बालाजी नगर नांदुरा यांच्या स्टेअरींगवरील बोटांना गंभीर जखमा झाल्या. हातावरही जखमा होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. शहर पोलिसांनी या अपघातप्रकरणी हायड्रोलीक फ्रोक चालक सचिन मोहन चव्हाण (वय ३८) रा.सावजी नगर मलकापूर यांच्याविरुद्ध अप.नं.५७/१८ कलम २७९, ३३७, ४२७ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.