खून प्रकरणातील आरोपी शिक्षक पती-पत्नीस अटक

By Admin | Updated: January 28, 2015 00:09 IST2015-01-28T00:09:01+5:302015-01-28T00:09:01+5:30

मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील खून प्रकरण.

In the murder case accused husband and wife arrested | खून प्रकरणातील आरोपी शिक्षक पती-पत्नीस अटक

खून प्रकरणातील आरोपी शिक्षक पती-पत्नीस अटक

जानेफळ (मेहकर, जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी शिक्षक पती-पत्नीस २६ जानेवारी रोजी मेहकर येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शेतीतील धुर्‍याच्या कारणावरुन झालेल्या वादात गजानन नागरिकचा खून झाला होता. तर सुशिल नागरिक व गणेश नागरिक हे गंभीर जखमी झाले होते. या खून प्रकरणातील आरोपी संजाबराव विठ्ठल बंगाळे व मिनाक्षी संजाबराव बंगाळे हे शिक्षक पतीपत्नी २४ जानेवारी पासून फरार होते. दरम्यान जानेफळ पोलिस त्यांच्या शोधात असतांना २६ जानेवारीला आरोपी शिक्षक पतीपत्नी मेहकर येथून पुण्याला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी शिक्षक पतीपत्नीस आरोपीस मेहकर येथून ताब्यात घेतले.

Web Title: In the murder case accused husband and wife arrested